वनवासी सेवा समिती

एकलव्य आश्रम शाळा

एक सुरुवात

एकलव्य आश्रमशाळेची स्थापना

वरिष्ठ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) स्वयंसेवकांच्या दूरदृष्टीने प्रेरित होऊन, वनवासी सेवा समितीने जामोड येथे एकलव्य आश्रमशाळा स्थापन केली.

वनवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी मागासलेल्या आणि दुर्गम भागांतील विद्यार्थ्यांसाठी निवासी सुविधा उपलब्ध करून देण्याचा उपक्रम वनवासी सेवा समितीने हाती घेतला. गेल्या ४० वर्षांपासून ही वसतिगृह सेवा कार्यरत आहे , विद्यार्थी जामोड शहरातील शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत.

या आश्रमशाळेची संकल्पना आणि प्रेरणा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दोन वरिष्ठ प्रचारक यांच्याकडून मिळाली:

सी.ई.ओ., खामगाव अर्बन
को-ऑपरेटिव्ह बँक

वरिष्ठ आर.एस.एस स्वयंसेवक, खामगाव जिल्हा

वरिष्ठ प्रचारक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

संस्थापकांचे दूरदृष्टिकोन

ते केवळ संस्था उभारणारे नव्हते – त्यांनी आशा, संधी आणि परिवर्तनाची अशी ज्योत पेटवली, जी पिढ्यान्‌पिढ्या तेजाळत राहील.

स्व. घनश्यामदासजी (काकाजी) गांधी, स्व. अजबऱाव बापू देशमुख आणि नारायणसिंहजी बायस (गुरुजी) हे केवळ सामाजिक कार्यकर्ते नव्हते, तर ही एक चळवळ होती, ज्याचे ते दीपस्तंभ होते.  त्या काळात हंडीमाल, शिवणी, अंबाबरवा आणि भिंगारा यांसारख्या दुर्गम आदिवासी गावांमध्ये रस्तेही नव्हते, वाहनांची तर कल्पनाही नव्हती. अशा काळात ते पायदळ प्रवास करत आदिवासी कुटुंबांशी संवाद साधत शिक्षणाचा प्रकाश पोहोचवत होते.

प्रारंभी केवळ ४० विद्यार्थ्यांपासून सुरुवात झाली, पण आज त्या प्रयत्नांचे फलित हजारो आदिवासी मुलांमध्ये दिसते आहे.

आश्रमशाळेचा परिसर- आवास व सुविधा

एकलव्य आश्रमशाळा’ – गुरु द्रोणाचार्यांचा सर्वोत्तम शिष्य एकलव्य यांच्या नावाने ओळखले जाणारे हे वसतिगृह, १ ली ते १० वी पर्यंतच्या आदिवासी विद्यार्थ्यांना आधार देते. सध्या १०० विद्यार्थ्यांची सुविधा असलेल्या या वसतिगृहात मोफत निवास, अन्न, कपडे, पुस्तके व वैद्यकीय उपचार दिले जातात.

सुमारे एका एकरात पसरलेल्या या आवारात निवास, भोजनगृह आणि स्टडी रुम  यांचा समावेश आहे.

या व्यतिरिक्त, वनवासी सेवा समिती – अन्न, वस्त्र, निवारा आणि आरोय शिबिर अश्या अनेक योजना राबविते .

कुपोषण आणि आरोग्य समस्यांवर मात करणे हा या संस्थेचा मुख्य उद्देश आहे.

प्रमुख उपक्रम

आमचे प्रभावाचे आधार स्तंभ

शैक्षणिक सहाय्य, जीवन कौशल्ये

मोफत वैद्यकीय तपासणी, पोषण आहार

व्यावसायिक प्रशिक्षण आणि इतर युवा कार्यक्रम

शासकीय मदतीविना चाललेली अखंड सेवा

गेल्या ४० वर्षांपासून, एकलव्य आश्रमशाळा कोणतीही शासकीय मदत न घेता अविरत कार्यरत आहे. या सेवेसाठी समाजप्रेमी दात्यांचे आणि सेवाभावी संस्थांचे योगदान मोलाचे  ठरले आहे.

१०० आदिवासी विद्यार्थ्यांची संपूर्ण जबाबदारी स्वीकारून त्यांना आवश्यक त्या सर्व गोष्टी मोफत पुरविण्याचा विडा या संस्थेने उचलला आहे

मोफत शिक्षण

अन्न व वैद्यकीय सुविधा

शाळेचा गणवेश, पुस्तके व शैक्षणिक साहित्य

शिक्षण, संस्कार आणि शिस्त

आमचे उद्दिष्ट केवळ इमारती उभारणे नसून , एक जबाबदार नागरिक घडविणे हेच आमचे खरे ध्येय आहे. 

विद्यार्थ्यांमध्ये खालील गुणांचे संवर्धन हे शिक्षणप्रक्रियेचा अविभाज्य भाग आहे:

Mike hardson

CEO & CO FOUNDER

आदिवासी मुलांना केवळ शिक्षणच नाही तर सकस अन्न , उत्तम आरोग्य सेवा, पुस्तके व गणवेश वाटप शिवाय नैतिक मार्गदर्शन करणे . अशाप्रकारच्या पोषक वातावणात, कुठल्याही सरकारी मदती शिवाय एकलव्य आश्रम शाळा मोठ्या डौलाने उभी आहे.