वनवासी सेवा समिती

वनवासी सेवा समिती

विकासासाठी आमचे प्रयत्न

वनवासी सेवा समिती (VSS) – एक स्वयंसेवी संस्था आहे, जी जळगाव जामोद (जि. बुलढाणा) येथे कार्यरत असून आदिवासी समाजाच्या समग्र विकासासाठी गेली अनेक वर्षे निःस्वार्थपणे कार्य करीत आहे. आमचे कार्यक्षेत्र जिल्ह्यातील दोन तालुक्यांतील सुमारे ५० आदिवासी वस्त्यांमधे विस्तारले आहे, जिथे आम्ही शिक्षण, आरोग्य सेवा, संस्कारविकास आणि स्वावलंबन यांसारख्या अनेक कार्यांमध्ये सातत्यपूर्ण सेवा देत आहोत.

सध्याचे प्राधान्य – स्वच्छता व सॅनिटेशन सुधारणा

आमच्या निवासी आश्रमशाळांमध्ये वास्तव्यास असलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांसाठी स्वच्छता व सॅनिटेशनच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करणे ही सध्या आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. या उपक्रमासाठी आम्हाला आर्थिक तसेच तांत्रिक सहकार्याची आवश्यकता आहे.

आपले योगदान या विद्यार्थ्यांसाठी आरोग्यदायी, सुरक्षित व सन्मानजनक निवासाचा मार्ग मोकळा करेल. आपण दिलेली मदत हे केवळ एक योगदान नसून, त्यांच्या उज्ज्वल भविष्याच्या उभारणीतला एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरेल.

परिचय- वनवासी सेवा समिती

वनवासी सेवा समिती (VSS) ची स्थापना १९८२ साली, मध्यप्रदेश सीमेलगतच्या सातपुडा पर्वतरांगांजवळील दुर्गम भागात करण्यात आली. जळगाव जामोद परिसरातील या पर्वतरांगांमध्ये कोरकू, भील आणि पावरा यांसारख्या आदिवासी जमातींचे सुमारे ५० पेक्षा अधिक पाड्यांमध्ये विस्तारित आहे.

या परिसरातील भौगोलिक रचना, दारिद्रय आणि मूलभूत सुविधा नसल्यामुळे येथील लोकांना शिक्षण, आरोग्यसेवा, रस्ते आणि दळणवळण यांसारख्या गरजेच्या गोष्टींपासून वंचित राहावे लागते. दुर्गम भाग शिवाय दूरवर विखुरलेली वस्ती या मुळे जीवनावश्यक बाबींचा येथे आभाव आढळतो.

संस्थापकांचे योगदान

दूरदृष्टी आणि समर्पण यांचा स्वप्नातून उभा राहिला सेवाभावाचा वटवृक्ष

कै. घनश्यामदासजी (काकाजी) गांधी, कै. अजबरावबापू देशमुख आणि नारायणसिंहजी बायस (गुरुजी) हे केवळ समाजसेवक नुसून –  एका महान सामाजिक जागृतीच्या चळवळीचे जणू  दीपस्तंभच होते.

ज्या काळात हंडीमाळ, शिवणी, अंबाबरवा आणि भिंगारा सारख्या अंतर्गत गावांमध्ये रस्तेही नव्हते, वाहतूक तर दूरची गोष्ट, त्या काळात या तिघांनी पायी प्रवास करत आदिवासी कुटुंबांपर्यंत पोहोचून शिक्षणाची ज्योत पेटविली

मूल्याधिष्ठित शिक्षण, आरोग्यसेवा, सांस्कृतिक जतन आणि सामाजिक उत्थान यांच्यामार्फत आदिवासी समाजाचा सर्वांगीण विकास घडवणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट. निष्कलंक सेवाभाव, राष्ट्राभिमान आणि आध्यात्मिक ओळख यांच्या आधारावर स्वावलंबी व्यक्तिमत्त्व आणि परंपरेशी नाते टिकविणारी समाजरचना उभारण्याचा आम्ही आटाकोट प्रयत्न करित आहोत.

एक सक्षम आदिवासी समाज – जेथे प्रत्येक व्यक्तिस गुणवत्ता पुर्ण शिक्षण , उत्तम आरोग्य सेवा , आत्मसन्मानाने जगण्याची संधी याशिवाय धर्म , राष्ट्रप्रेम , एकात्त्मता या मूल्यांवर आधारित जीवनशैलीचा सर्वांगिण विकास हीच आमची दूरदृष्टी आहे

ध्येयाचा व्यापक दृष्टिकोन

आमचे ध्येय केवळ भोतिक  विकासापुरते मर्यादित नसून —
आदिवासी समाजाची सांस्कृतिक ओळख जपणे हे आहे

एक उत्कृष्ट नागरिक घडविण्यासाठी समाजरचनेचा मुलभुत पाया मजबुत करणे हीच आमची मुख्य भूमिका आहे

सातत्यपूर्ण प्रभाव – परिवर्तनाची खरी कहाणी

वनवासी सेवा समितीचे माजी विद्यार्थी आज शिक्षक, डॉक्टर, अभियंते आणि प्रशासकीय सेवांमध्ये कार्यरत आहेत — मूल्याधिष्ठित शिक्षणाने अशक्य वाटणारी स्वप्नेही साकार झाली. त्यांच्या आयुष्यात घडवलेले हे आमूलाग्र परिवर्तन हीच आम्हाला मिळालेली खरी पावती आहे.

सर्व प्रकारचे सहकार्य आम्ही देतो

प्रेरणा आणि मार्गदर्शन

वनवासी सेवा समितीच्या माजी विद्यार्थ्यांच्या उंचावलेल्या  यशोगाथा-  हे केवळ त्यांच्या वैयक्तिक प्रगतीचेच नाही, तर त्यांना मिळालेल्या सातत्यपूर्ण मार्गदर्शना मुळे सहज शक्य झाले. 

५००० हून अधिक वनवासी विद्यार्थी सशक्त बनले

आज या विद्यार्थ्यांपैकी अनेक जण शिक्षण, आरोग्य, शासनव्यवस्था आणि अभियांत्रिकी क्षेत्रात मानाचे स्थान भूषवितात

माजी विद्यार्थी – परिवर्तनाचे अग्रदूत

विद्यार्थ्यांचे सशक्त नेटवर्क आता सामाजिक बांधिलकी जपत कार्यरत आहे. नव्या पिढीच्या युवकांना प्रेरणा आणि दिशा देण्या मागे यांचे मोलाचे योगदान आहे